भिगवण (वार्ताहर) – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण जवळ एसटी आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये ५ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ठाणे- उस्मानाबाद या एसटीने शिवशाही बसला मदनवाडी (ता. इंदापूर) येथील ओढ्याच्या पुलावर पाठीमागून जोरदार धडक दिली.