पुणे – पुणे-मुंबई महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातील गारमाळ पॉईंटजवळ कराड-मुंबई बसचा अपघात भीषण अपघात झाला. बसच्या चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस दरीत कोसळली. दरम्यान, महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस यांच्या साथीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
Maharashtra: 4 people dead and around 30 injured after a bus driver lost control of his vehicle on old Pune-Mumbai highway, near Bhor Ghat, today. pic.twitter.com/r4H3cl5g7r
— ANI (@ANI) November 4, 2019