आयएनएस विक्रमादित्य वर अपघात : एका अधिकाऱ्याचा मृत्यू

कारवार (कर्नाटक) – भारताची विमानवाहू युद्ध नौका आयएनएस विक्रमादित्य वर अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये आग विझवताना एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर आगीवर नियंत्रण मिळविण्यात क्रू ला यश आले आहे. नौदल विभागाने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी २०१६ मधील एका अपघातामध्ये आयएनएस विक्रमादित्य वरील २ जवान शहीद झाले होते.

रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही नौदलाची सर्वात मोठी नौका आहे. रशियाकडून घेतल्यानंतर दीर्घकाळ प्रतीक्षेत राहिलेली ही युद्धनौका १४ जून २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात दाखल झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.