“एक्‍सप्रेस वे’वर अपघात

एका महिलेचा मृत्यू; मोटारीतील तिघे जखमी

लोणावळा – पुणे-मुंबई द्रूतगतीवर देवले गावच्या हद्दीमध्ये एका मोटारीने पुढे जात असलेल्या अनोळखी वाहनाला मागील बाजूस धडक दिली. या अपघातात मोटारमधील बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारचालकासह अन्य तीन जण जखमी झाले आहे. एक्‍सप्रेस वेवर देवले गावाच्या हद्दीमध्ये किलोमीटर क्र. 60 जवळ सोमवारी (दि. 15) पहाटे पावणेचारच्या सुमारास हा अपघात घडला.

सीताबाई किसन शिंदे (वय 65, रा. एकवीरा अपार्टमेंट, कल्याण, ठाणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संदीप विठ्ठल काटकर (रा. एकवीरा अपार्टमेंट, कल्याण, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताराहून मुंबईच्या दिशेने मोटारीतून (एम.एच.43.बी. के.3745) सीताबाई शिंदे यांच्यासह अन्य तीन नातेवाईक पहाटे निघाले होते. पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावरून जाताना देवले गावच्या हद्दीत एका वाहनावर आदळले. या अपघातात सीताबाई शिंदे यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जखमी झाले आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राम भोसले तपास करीत आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.