फिरोजाबाद – उत्तरप्रदेश येथील फिरोजाबादमध्ये आगरा-लखनऊ एक्सप्रेस वेवर डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जण जखमी आहे. जखमींना सैफई मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिरोजाबाद इटावाचच्या बॉर्डरजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रात्री 10 वाजता ही घटना घडली.
Firozabad: At least 14 feared dead & many injured after a bus collided with a truck on the Agra-Lucknow Expressway in Bhadan, yesterday late night. Sachindra Patel, SSP say,”there were at least 40-45 passengers in the bus. Injured have been shifted to Saifai Mini PGI.” pic.twitter.com/HrmNSZGHAl
— ANI UP (@ANINewsUP) February 12, 2020
मिळलेल्या माहितीनुसार, ट्रकचा टायर पंचर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता, यादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या डबल डेकर बसने ट्रकला जोरदार धडक दिली. या बसमध्ये 40-45 प्रवासी होते. सर्व जखमी प्रवाश्यांना सैफई मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.