बुलढाणा – रस्त्यावरील खड्डा चुकविताना ट्रॅव्हल्सची समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात बारा प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर कोलोरी फाटा गावाजवळ पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडला. जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यप्रदेशच्या उजैन येथून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची ट्रकला कोलोरी फाटा गावाजवळ जोरदार धडक बसली. या ट्रॅव्हल बसमध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात बस चालकासह इतर 12 प्रवासी जखमी झाले आहेत. तर यात 3 जण गंभीर जखमी आहेत.
या अपघातात ट्रायव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले आहे. अपघातप्रकरणी ट्रक चालक आणि बस चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.