मंगरुळपीर : पुण्यावरून अमरावती जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर पहाटेच्या ५ वाजताचे सुमारास भीषण अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता असून, या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींचा एकूण आकडा २० ते २५ असल्याचे समजते आणि अती गंभीर ४ ते ५ जखमीना ताबडतोब अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच १४ एच.जी ६६६७ ही नागपुर लेन वरून जात होती. यावेळी चॅनल क्र. २१५ चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे किंवा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता असून, या अपघातात घटनास्थळावर एक व्यक्ती ठार झाली आहे. जखमींना विविध रुग्णवाहिकेद्वारे कारंजा, शेलूबाजार आणि अकोला येथे हलवण्यात आले असून, पुढील तपासात अपघाताचे नेमके कारण उलगडण्याची कामगिरी सुरू आहे.