नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. नांदेड विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. नांदेड शहरातील आसना बायपास परिसरात गाडी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला. या गाडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.
काय घडले नेमके?
आदिती तटकरे यांचा ताफा भोकरचा कार्यक्रम आटोपून नांदेड विमानतळाकडे येत होता. या दरम्यान नांदेड शहरालगत आसना बायपास परिसरात आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही मात्र फॉर्च्यूनर गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.