माळेगाव – बारामती तालुक्यातील शिरवली हद्दीतील काळा ओढा येथे आज एसटी बस (एमएच 14 बी टी 4410) आणि टेम्पो यांचा भीषण अपघात झाला आहे. बारामतीकडे निघालेल्या टेम्पोचा अचानक पुढील टायर फुटल्याने हा अपघात घडून आला. ही घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, या अपघातात अंदाजे दहा ते पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, जखमींवर सांगवी व बारामती येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.