मोटारीच्या धडकेने एकाचा मृत्यू

पिंपरी – भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो गाडीने जोराची धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. 26 मे रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील पंचशील हॉटेल समोर घडली. यशवंत बाबू पेटकर (वय-58) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

या प्रकरणी लक्ष्मण अशोक पेटकर (वय-26) रा. पंचशील हॉटेलच्या मागे, इंदिरानगर, चिंचवड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात बोलेरो गाडीच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत पेटकर हे 26 मे रोजी पिंपरी येथील पंचशील हॉटेलच्या समोरील रोडवरुन जात असताना एका बोलेरो गाडीच्या चालकाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)