लष्करी वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू

देहुरोड : पुणे-मुंबई महामार्गावर देहुरोड येथील वीरस्थळाजवळ लष्करी वाहनाने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 13) सकाळी पावणे आठच्या सुमारास झाला.

काशीनाथ विठोबा नंदकर (वय 59, रा. जीवन रेखा रुग्णालयाजवळ, भोंडवे बिल्डिंग, शिवाजीनगर, देहुरोड) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीनाथ हा सकाळी कामाला जाताना होता. पुणे-मुंबई महामार्गावर देहुरोड येथील देहू फाट्यावरील वीरस्थळाजवळ पायी जात असताना लष्करी वाहनाने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. काही लष्करांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान काशीनाथचा मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.