बालेवाडी येथे पादचाऱ्याचा अपघातात मृत्यू

पिंपरी -बालेवाडी येथे पादचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकऱणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनोजकुमार कैलास सहानी (वय-37 रा.आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते लवन मनराज सहानी हे रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.