खळद – सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद (ता. पुरंदर) येथे माऊली गार्डन मंगल कार्यालयासमोर ट्रक व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार किशोर भीमराव खलाटे (वय 30, रा. लाटे, ता. बारामती) या तरुणाचा मृत्यू झाला.
पालखी महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट असून अपघातग्रस्त ठिकाणी हा रोड एकेरी झाला आहे. दुचाकीस्वार हा सासवडहून जेजुरीच्या दिशेने जात होता तर ट्रक हा जेजुरीहून येत असताना हा अपघात झाला.
यामध्ये या अपघाताची तीव्रता अधिक असल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत सासवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून हवालदार बी. जी. जगताप तपास करीत आहेत.