बुलढाणा – चालकाला डुलकी लागल्यामुळे टेम्पोला भीषण अपघात झाल्याची बामती समोर आली आहे. हा टेम्पो पंढरपूरवरून देवदर्शनकरून येत असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात 35 भाविक जखमी झाले असून हा भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातील मेरा खुर्द फाट्याजवळ झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
भाविकांनी भरलेला हा टेम्पो पंढरपूरवरून दर्शन घेऊन माघारी परत जात होता. दरम्यान टेम्पो चालकाला अचानक डुलकी लागली. त्यामुळे हा भाविकांनी भरलेला टेम्पो रस्त्याच्या दुभाजकाला आदळला व पटली झाला.
या अपघातात 20 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत तर 15 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त भाविकांना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.