लग्न लावून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या मोटारीला अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

प्रतापगढ –  विवाहाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मोटारीची ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सहा मुलांसह 14 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे झालेल्या या अपघातात कोणीही बचावले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रयागराज लखनौ महामार्गावर गुरूवारी मध्यारात्री हा अपघात घडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त झाला आहे. या अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यसाठी पोलिसांना गॅस कटरचा वापर करावा लागला. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागला.

हे सर्व नागरिक प्रतापगढमधील कुंदा भागातील रहिवासी होते. नवाबगंज भागातून विवाह आटोपून परत येत होते. या मोटारीच्या चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला असावा अशी शक्‍यता अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनुराग आर्य यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.