दोघा परप्रांतीय मजुरांचा मार्बलखाली दबून मृत्यू

नगर – ट्रकमधून आलेले हजारो टनाचे मार्बल उतरविताना त्याखाली दबून झालेल्या दोघांना मृत्यू झाला. सावेडीतील जॉगिंग ट्रकशेजारील खंडेलवाल भवन येथे आज दुपारी ही घटना घडली. राज भगवानदास साकेत व विनोद छोटूलाल सरोज (सध्या रा. एमआयडीसी वसाहत) अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.

ट्रकमध्ये असलेल्या मार्बल काढण्यासाठी हे दोघे शिरले होते. दोन्ही बाजूच्या मार्बलमध्ये असलेल्या आधाराचे लाकूड या दोघांनी हटविले. त्याचवेळी एका बाजूचे मार्बल या दोन्ही मजुरांच्या अंगावर आले. हजारो टनाच्या मार्बलखाली दबून या दोघांचा जागेवर मृत्यू झाला. मजुरांच्या अंगावर पडलेले हे मार्बल हटविताना ते फोडण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन तासानंतर या मजुरांच्या अंगावरील मार्बल हटविण्यात इतर मजुरांना यश आले. जिल्हा रुणालयात या दोन्ही मजुरांची उत्तरीय तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)