भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; शेतकऱ्याचा मृत्यू

पुणे,दि.4- भरधाव डंपरने ढोकरल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सागर गोते (बिवरी,ता.हवेली,जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गोते यांच्या मौजै बिवरी,ता.हवेली,जि.पुणे येथे रहाते घरासमोर घडली.

यातील फिर्यादी यांचे वडील जिजाबा सोनबा गोते (75) हे मोटार सायकलवरून त्यांचे शेतामध्ये जात असताना, त्यांचे राहते घराचे पुढे 100 फुट अंतरावर त्यांचे पाठीमागुन येणा-या डंपरवरील चालकाने त्याचे ताब्यातील डंपर हा वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने,अविचाराने व भरधाव वेगात चालवुन जिजाबा गोते यांना जबर ठोस मारली.

यामध्ये गंभीर जखमी झाल्याने जिजाबा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास पाटील करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.