गौरव गिलच्या गाडीला स्पर्धेदरम्यान अपघात

दुचाकिला बसलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली – अर्जुन पुरस्कार विजेता फॉर्म्युला वन कार रेसिंग ड्रायव्हर गौरव गिलच्या गाडीला स्पर्धेदरम्यान अपघात झाला. नॅशनल रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेवेळी ट्रॅकवर चुकिने आलेल्या दुचाकीला धडक बसल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात गौरव गिलला दुखापत झाली आहे. गिलला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच चालक ठरला होता.

गौरव गिलच्या गाडीला शनिवारी एफएमएससीआय इंडियन रॅली चॅम्पियनशिप 2019 च्या शर्यतीवेळी अपघात झाला. होतरडा गावाजवळ ट्रॅकवर समोरून आलेल्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात नरेंद्र, त्याची पत्नी आणि मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शनिवारी स्पर्धा रद्द करण्यात आली.

स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले की, रॅलीत सहभागी असलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. तिसऱ्या फेरीवेळी ही घटना घडली. त्यानंतर रॅली रद्द करण्यात आली. दुचाकी चुकून प्रतिबंध असलेल्या भागात आली होती. कारचा वेग जास्त होता आणि वळण असल्याने कारचालकाला दुचाकी दिसली नाही.

एफएफएससीआयचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पृथ्वीराज म्हणाले, सुरक्षेचा सर्व नियमांचे आणि अटींचे पालन केल्यानंतरही ट्रॅकवर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या वाईट काळात मोटरस्पोर्टस समुह त्यांच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.