धुळे | ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर करोडी येथील पुलाखील झाला. या अपघातात परसोडा (ता. वैजापूर) येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
परसोडा येथील संजय पुनमचंद छानवाल आणि त्यांची पत्नी मीना छानवाल हे दोघे दुचाकीवरून कामानिमित्त संभाजीनगर शहराकडे जात होते. त्यावेळी करोडी येथील पुलाखाली आले असता त्यांच्या दुचाकीला मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की धडकेनंतर ट्रकने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.