पुणे- सध्या राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या पासवामुळे पुणेकरांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, शहरात काल झालेल्या पावसामुळे कार्वेनगर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पार्किंगला लावण्यात आलेल्या एका रिक्षावर पहाटेच्या वेळी झाड पडले असून, रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या घटने मध्ये कोणीही जखमी झाले नाही.