अकोला- अकोल्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून याअपघातात तीन जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. अकोला शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर भीषण हा अपघात झाला आहे. कारमधील अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.
रिधोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रात्री 1 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. मध्यरात्री अपघात झाल्यामुळे मदत कार्यमिळण्यास उशीर झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून अपघातग्रस्त कारमधून चार जण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून शेगावकडून वाशिमच्या देशेने प्रवास करत होते. रम्यान रात्री एकच्या सुमारास एका भरधाव ट्रकने मृतांच्या कारला भीषण धडक मारली. या भीषण अपघात कार मधील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
अपघातात गंभीर झालेल्यास उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातील मृत सर्वजण वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.