पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांना प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात सध्या जीवनावश्यक सेवा सुरु आहेत. मात्र याठिकाणी सुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे.
दत्तनगर येथे असणाऱ्या डी- मार्टमध्ये सामान खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र या सर्व नागरिकांची योग्य ती तपासणी करूनच आतमध्ये प्रवेश देण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक रांगेत उभे असून एका वेळी केवळ ५ नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. प्रत्येक नागरिकांची तपासणी करून प्रवेश दिला जात आहे.