Delhi Election : आम आदमी पक्षाच्या पराभवाबद्दल आतिशी म्हणाल्या, कालकाजीच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी माझ्या टीमचे अभिनंदन करते ज्यांनी जमिनीवर कठोर परिश्रम केले आणि मसल पॉवर, गुंडगिरी आणि मारहाणीचा सामना करूनही लोकांपर्यंत पोहोचले. बाकी दिल्लीच्या जनतेचा जनादेश आहे आणि मी जनादेश स्वीकारते.
मी माझी जागा जिंकली आहे पण ही जल्लोष करण्याची वेळ नाही. भाजपविरुद्धची लढाई सुरूच राहील. आम आदमी पक्षाने नेहमीच चुकीच्या गोष्टींविरूध्द लढा दिला आहे आणि आम्ही पुढेही असेच करत राहणार आहोत. हा निश्चितच एक धक्का असला तरी दिल्ली आणि देशातील लोकांसाठीचा आम आदमी पार्टीचा संघर्ष संपणार नाही.