आयुक्तांचा दणका : स्वीकृत नगरसेवक ठरले अपात्र; अपुरे कागदपत्रे केली सादर ; सभेत गोंधळ : पुढील महासभेकडे सर्वांचे लक्ष
नगर – महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने ही निवड आज होईल असे नगरकरांना वाटत होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना आणि भाजपच्या गटनेत्यांनी सुचविलेले पाचही उमेदवारांची नावे जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी अपूऱ्या कागदपत्राअभावी अपात्र ठरविले.
त्यामुळे निवडीमध्ये उमेदवारांसह गटनेतेच कागदपत्रा अभावी नापास झाल्याने, स्विकृत नगरसेवकांच्या निवडीची पुन्हा नगरकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या गटनेत्यांनी गुरूवारी सायंकाळी बंद लिाफ्यात स्वीकृतांची नावे आयुक्तांना सादर केली होती. त्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. या पाचही उमेदवार स्वीकृतसाठी अपात्र आहेत. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रात पाच वर्ष सामाजिक संस्थेचे पदाधिकारी असल्याचे सिद्ध होत नाही.
तसेच त्या संस्थेचे कार्यक्षेत स्पष्ट होत नसल्याने कागदपत्र अपूर्ण असल्याने ते अपात्र ठरत असल्याची शिफारस आयुक्तांनी महासभेला सादर केला. त्यानंतर महापौरांनी स्वीकृतसाठी शिवसेनेकडून संग्राम शेळके, मदन आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून बाबासाहेब गाडळकर, विपुल शेटिया आणि भारतीय जनता पक्षाकडून रामदास आंधळे यांची नावे आली असल्याचे जाहीर केले. यावेळी महासभेला उपमहापौर मालणताई ढोणे, नगरसचिव तडवी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वीकृत नगरसेवक साठी संग्राम शेळके यांनी साई सेवा संघ, मदन आढाव यांनी नवनाथ देवस्थान ट्रस्ट व स्वामी प्रतिष्ठान, विपुल शेटिया व बाबासाहेब गाडळकर यांनी विचारधन चेस अकॅडमी व स्पोर्ट संस्था, रामदास आंधळे यांनी सावली संस्थेच्या माध्यातून सामाजिक कार्य केले असल्याची कागदपत्र सादर केली. तसेच ऑडिट रिपोर्ट जोडले होते.
मी पोस्टमनचे काम केले : तडवी
गट नेत्यांनी दिलेली स्वीकृत नगरसेवाकांची नावे आयुक्तांनी अपात्र ठरविल्याने महासभेत एकच गोंधळ उडाला. याबाबत काही नगरसेवकांकडून तडवी यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न झाला. व प्रक्रीयेत प्रशासनाने एक अधिकारी नियुक्त करून आम्हाला निवडणुक विषयक सविस्तर माहिती देणे अपेक्षित होते. मात्र असे तडवी यांनी सांगितले नाही.
असे म्हणताच तडवी म्हणाले की, तुम्ही दिलेला बंद लिफाफा पोस्टमन सारखा हा आयुक्तांना सादर केला. त्यावर बोलण्याचा व माहिती देण्याचा माझा अधिकार नाही. मी जर बोललो असतो तर तुम्ही माझ्या कार्यालयात घुसले असते. याबाबत नगरसेवक म्हणाले की आम्ही गुंड आहोत का? असे म्हणत एकच गोंधळ उडाला.
निवडी अभावी गुलाल अन फटाके राहिले तसेच
महापालिकेत आज स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेबाहेर गर्दी गेली होती. तसेच पोलीसांचाही कडा बंदोबस्त होता. मात्र, जिल्हाधिकारी यांनी कागदपत्राअभावी निवडी अपात्र ठरविल्याने समर्थकांचा गुलाल अन फटाकडे रतसेच राहिले. त्यामुळे नगरसेवकांसह त्यांच्या सर्थकांचा हिरोड झाला.