“सीएसआर’च्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना गती

वासुंदे- क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झुमर इलेक्‍ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वासुंदे (ता. दौंड) या जिरायत भागातील गावांमध्ये पाण्याचे स्रोत बळकट करण्याच्या हेतूने पाणलोट विकास कामांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

वासुंदे तील गट नंबर 69 मध्ये “सीएसआर’चे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप, प्रोजेक्‍ट कॉर्डिनेटर अमित खंडाळे आणि टेक्‍निकल ऑफिसर दत्ता लोंढे यांच्या प्रयत्नातून माती नाला बांध बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशा कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे “सीएसआर’च्या प्रकल्प संचालकांनी सांगितले. “क्रॉम्प्टन ग्रीव्हज’चे मुख्य वित्त अधिकारी संदीप बात्रा, संजय विश्वास, चंद्रशेखर भुसा, यशवंतराव होले यांच्या सहकार्यातून ही कामे होणार आहेत. या कामाचा फायदा येथील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी होणार आहे. यावेळी वासुंदेचे सरपंच नीलेश भोईटे, उपसरपंच किशोर जांबले, प्रभाकर जाबंले, गोरख जाबंले, दीपक जाबंले, वासुंदे सोसायटीचे अध्यक्ष उमाजी मेरगळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन हाजबे, सुनील लोंढे, दिलीप जाबंले, शिवाजी धुमाळ, रमेश जाबंले, मयुर जांबले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.