सातारा – लग्नाचे अमिष दाखवन युवतीवर सातारा शहर आणि आणि जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर (रा. 393 करंजे पेठ) याच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 वषींय युवतीच्या फिर्यादीवरून या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपीने संबंधित युवतीची फेसबुकद्वारे ओळख वाढवली व तिला लग्नाचे अमिष दाखवून 30 एप्रिल 2020 ते 20 डिसेंबर 2022 यवतेश्वर बामणोली, दापोली, गुहागर, चिपळूण येथे फिरायला घेऊन जाऊन वेळोवेळी तिच्याशी इच्छाविरुद्ध शरीर संबंध केले. संबंधित युवती या प्रकरणात चार महिन्याची गरोदर राहिली. त्यानंतर संबंधित युवतीवर दबाव टाकून तिचा गर्भपात करण्यात आला. संबंधित युवतीची फसवणूक झाल्याने तिने शुक्रवारी मेढा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.