शहरात भुसार माल मुबलक; घाऊक बाजारात दर स्थिर

दुप्पट भाड्यामुळे किरकोळ बाजारात मात्र 5 ते 10 टक्के वाढ

पुणे : शहरात भुसार मालाचा अजिबात तुटवडा नसून, मार्केट यार्डातील घाऊक व्यापाऱ्यांकडून कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. मात्र, वाहतूकदारांना परतीचे भाडे द्यावे लागत असल्याने किरकोळ बाजारात काही वस्तूंच्या किमतीत 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मार्केटयार्डातील भुसार बाजाराचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत सुरू असून घाऊक व्यापाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यात आलेली नाही.

मात्र, माल वाहतूक करताना परतीचे भाडे द्यावे लागत आहे. दुप्पट भाढेवाढीमुळे काही वस्तूंच्या किमतीत फरक पडू शकतो. बाजारात भुसार मालाचा अजिबात तुटवडा नाही, अशी माहिती दी पूना मर्चंटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

दरम्यान, घाऊक व्यापाऱ्यांकडून कोणतीही दरवाढ करण्यात आली नसली तरी किराणा माल विक्रेत्यांकडून मूळ वस्तूंच्या किमतीपेक्षा जादा दर आकारण्यास सुरुवात झाली आहे. घाऊक बाजारातील मूळदरापेक्षा किरकोळ बाजारात 5 ते 10 टक्क्‌यांनी दरवाढ झालेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.