पुलवामा जिल्ह्यात बुधवारी ठार झालेला दहशतवादी अबु सैफुल्ला !

श्रीनगर – पुलवामा जिल्ह्यात गेल्या बुधवारी सुरक्षा जवानांबरोबर ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून तो जैश ए महंमदचा दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अबु सैफुल्ला आिीण अबु कासीम या नावाने तो वावरत होता. दक्षिण काश्‍मीर मधील सरकार नियुक्त स्पेशल पोलिस ऑफिसर्सना धमकावणे, बिगर काश्‍मीरी मजुरांना काश्‍मीर खोऱ्यातून पळवून लवणे, नागरीकांचे अपहरण आणि हत्या करणे अशा कारवायांमध्ये तो गुंतला होता.जैश ए महंमदचा पाकिस्तान स्थित प्रमुख कारी यासीर याचा तो निकटचा सहकारी मानला जात होता.

अवंतीपुरा भागातील शोध कार्याच्यावेळी अबु सैफुल्ला हा तेथ आपल्या एका सहकाऱ्यासह लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी तो भाग घेरला होता. त्यावेळी त्याची आणि सुरक्षा जवानांची मोठी चकमक बराच काळ सुरू होती. दहशतवाद्यांकडून तेथे करण्यात आलेल्या गोळीबारात राष्ट्रीय रायफल्सचे जवान राहुल रणसंवाल, आणि स्थानिक पोलिस दलाचे एसपीओ शहाबाज अहमद हे दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले पण दोघांचेही तेथे निधन झाले.बराच काळ सुरक्षा जवानांशी झुंजल्यानंतर अखेरीला अबु सैफुल्लाला ठार करण्यात जवानांना यश आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here