वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करत सुटलेला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला डोनाल्ड ट्रम्प यांनी पुष्टी दिली आहे. अमेरिकेनं आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी आज सकाळी सीरियामध्ये मोठी मोहीम हाती घेतली होती.
#WATCH US President Donald Trump: He (Abu Bakr al-Baghdadi) will never again harm another innocent man, woman or child. He died like a dog, he died like a coward. The world is now a much safer place. pic.twitter.com/8NB69yA3b1
— ANI (@ANI) October 27, 2019
बगदादी हा एका भूयारात लपला होता. अमेरिकन सैन्याने केल्या आत्मघातकी हल्ल्यात तो मारला गेला आहे. तसेच बगदादीसोबत लपलेले त्याचे तीन मुलेही मारले गेले असल्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणले की कुठलाही बगदादी आता कुठल्याच निष्पाप माणसाला, स्त्रीला किंवा मुलांना इजा पोहचविणार नाही. कारण हा बगदादी कुत्र्यासारखा मरण पावला असून, त्यामुळे आता जग हे एक सुरक्षित ठिकाण झालं आहे.
अमेरिकेने रविवारी सकाळी ही कारवाई केल्यानंतर ट्रम्प यांनी काहीतरी मोठं घडतंय, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी उशिरा त्यांनी बगदादी मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.
दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून लपून असलेला बगदादी हा अनेकदा हल्ल्यांमध्ये ठार झाल्याचे वृत्त यापूर्वी आले आहेत. दोन वर्षांपूर्वीही रशियाच्या सैन्याने बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र नंतर हा दावा खोटा ठरला होता.