निर्घृण ! बायकोच्या विवाहबाह्य संबंधात पतीचा अडथळा;डोळे-नाक-कानात फेविक्विक टाकून अमानुषपणे हत्या

गया: बिहारमधील गया मधील एका महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याची बाब नवऱ्याला कळताच त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोने आपल्या परिवारासह नातेवाईकासोबत मिळून हे कृत्य केले आहे. असे सांगितले जात आहे की, बायकोने आपल्या नातेवाईकांसोबत मिळून नवऱ्याला मारहाण सुद्धा केली. ऐवढेच नाही तर डोळे, नाक आणि कानात फेविक्विक टाकल्यानंतर त्याच्यावर चाकूने वार सुद्धा केले

सलेमपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या मुन्ना गुप्ताची पत्नी जुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याची माहिती मुन्नाला मिळाली. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. तेव्हापासून मुन्ना आणि जुलीमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारीदेखील दोघांमध्ये याच विषयावरून वाद झाला. त्यानंतर जुलीने तिचे आई, वडील आणि अन्य कुटुंबियांसह मुन्नाला मारहाण केल्याच आरोप आहे.

बेदम मारहाणीमुळे मुन्ना बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकले. आरोपी इथेच थांबले नाहीत. त्यांनी मुन्नाच्या शरीरावर चाकूने वार केले. यानंतर आरोपींनी मुन्नाचा मृतदेह एका गोणीत भरला. मृतदेह जाळण्यासाठी आरोपी घराबाहेर पडले. ते पेट्रोल खरेदी करण्यासाठी निघाले असताना पोलिसांना संशय आला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांना पाहताच आरोपी दुचाकी आणि मृतदेह टाकून पळू लागले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून आरोपींची शोधाशोध सुरू केली. मुन्नाची पत्नी जुली, त्याचे सासरे दुर्गा साव आणि सासू संजू देवी यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.