सुमारे दोनशे डॉक्‍टर्स करोनाने दगावले

पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची आयएमएफची मागणी

नवी दिल्ली – देशातील 196 डॉक्‍टर्स करोनामुळे आतापर्यंत दगावले असून ही स्थिती चिंताजनक आहे. यात पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला पाहिजे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. करोनाशी लढा देताना डॉक्‍टरांनाच आपले प्राण गमवावे लागत आहेत.

या कामात रोजच आणखीही नवीन डॉक्‍टर करोनाग्रस्त होत असून त्यातूनही डॉक्‍टरांच्या प्राणहानीची भीती वाढली आहे. करोनाग्रस्त होणाऱ्या डॉक्‍टरांमध्ये जनरल प्रॅक्‍टिशनर्सची संख्या मोठी आहे. असंख्य स्थानिक नागरिक सर्वात आधी त्यांच्या भागातील जनरल प्रॅक्‍टिनशर्स डॉक्‍टरांकडे जातात आणि त्यांनाच करोना संक्रमणाचा धोका मोठा असतो.

या पार्श्‍वभूमीवर डॉक्‍टरांच्या हिताची काळजी घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षाप्रदान करण्यासाठी पंतप्रधानांनीच हस्तक्षेप केला पाहिजे, अशी अपेक्षा आयएमएफने केली आहे. देशभरातील सुमारे साडेतीन लाख डॉक्‍टर्स आयएमएफचे सदस्य आहेत.

हे सर्व जण जीव धोक्‍यात घालून सार्वजनिक आरोग्याची काळजी वाहात आहेत. त्यांना आता सुरक्षा प्रदान करण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही आयएमएफने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.