Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अबाऊट टर्न: पारदर्शक नातं

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2023 | 7:46 am
A A
अबाऊट टर्न: पारदर्शक नातं

“यात खोटं वाटण्यासारखं काय आहे? खरंच नाही माहीत मला!’ भिशीसाठी जमलेल्या महिलांमधल्या एकीचा मैत्रिणींना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न बराच वेळ सुरू होता आणि मैत्रिणी काही तिच्यावर विश्‍वास ठेवायला तयार नव्हत्या. पतीची इतकी महत्त्वाची गोष्ट पत्नीला माहीत नसणं शक्‍यच नाही, असं सगळ्यांचं पक्‍कं मत होतं. सबब “माहीत नाही’ म्हणणारी मैत्रिण आपल्यापासून काहीतरी लपवतेय, अशी शंका सर्वजणींना होती.

असं काय विचारलं होतं मैत्रिणींनी? भिशीच्या पैशांची जुळणी करण्यासाठी आपल्याला दरमहा कशी कसरत करावी लागते, हे संबंधित महिला सांगत होती आणि तिथून सुरू झालेला विषय थेट नवऱ्याच्या पगारावर जाऊन पोहोचला होता. संबंधित महिलेला पतीचा पगार सांगता आला नाही आणि त्यावरून सगळ्यांनी तिच्यावर अविश्‍वास दाखवून टिंगलटवाळी सुरू केली होती. संबंधित महिलेनंही मैत्रिणींचे टोमणे हसतखेळत झेलले; पण घरी जाताना तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.

आपल्या पतीला किती पगार मिळतो हेही आपल्याला ठाऊक नाही, याचं दुःख तिला प्रथमच एवढ्या तीव्रतेनं जाणवलं होतं. स्कूटी चालवता-चालवता तिच्या मनात येत होतं… माझ्यासारखी एक तरी स्त्री असेल का? पगाराचा विषय निघाला की नवरा नेहमी टाळाटाळ का करतो? मी हाउसवाइफ आहे म्हणून? पण म्हणून काय झालं? मला हक्‍कच नाही का नवऱ्याचा पगार माहीत करून घेण्याचा? मी कमावती असते तर परिस्थिती वेगळी दिसली असती का?

हळूहळू एकीला दोघी, दोघींना चौघी भेटत गेल्या आणि कालांतरानं त्या महिलेला समजून चुकलं, की आपण एकमेव नाही. बरेच नवरे बायकोला पगाराचा आकडा सांगत नाहीत किंवा चुकीचा सांगतात. काही नवऱ्यांना तर “पगार किती,’ हा प्रश्‍नही खपत नाही… आपल्यासारखं कुणीतरी आहे, हे पाहून ती सुखावत असतानाच समोर पडलेला पेपर तिला वेगळंच काहीतरी सांगत होता… इंग्लंडच्या केली स्कूल ऑफ बिझनेसनं केलेल्या अभ्यासाची बातमी वाचताना तिच्या मनात आलं,

हे परदेशी लोक नेहमी चित्रविचित्र सर्व्हे करतात आणि तितकेच चित्रविचित्र निष्कर्ष काढतात. म्हणूनच बहुतेक यांचे अहवाल येतात आणि जातात. कुणीच ढुंकून बघत नाही यांच्या निष्कर्षाकडे..! काय तर म्हणे, नवरा-बायकोचं बॅंकेत जॉइंट अकाउंट! कसं शक्‍य आहे? तिने पुढं वाचलं, जॉइंट अकाउंट असेल तर नवरा-बायकोच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहते. मग म्हणे त्यांच्यात भांडणं कमी होतात आणि त्यांचं नातं बरीच वर्षे टिकतं. संशोधकांनी काही जोडप्यांना जॉइंट अकाउंट काढायला सांगितलं आणि काही जोडप्यांना वेगवेगळी..! हे वाचून ती मनातल्या मनात पुटपुटली, “म्हणजे भांडणं लावायला यांनी इथेच सुरुवात केली.’

ज्यांची स्वतंत्र अकाउंट्‌स होती, त्या तुलनेत जॉइंट अकाउंटवाली जोडपी अधिक सुखी आढळली, असा संशोधकांचा निष्कर्ष! पण मुळात नवरा-बायकोचं बॅंकेत जॉइंट अकाउंट असू शकतं, हेच तिला काही केल्या पटेना. मोबाइलचा पासवर्ड विचारला म्हणून एकमेकांवर खेकसणारे नवरा-बायको जॉइंट अकाउंट कसं काढतील? ती विचार करू लागली… पारदर्शकतेमुळे संसार सुखाचे होतात हे खरंय; पण आपण तर भिशी सुरू केल्याचंही नवऱ्याला सांगितलेलं नाही! सांगायला हवं का? खरंच इतकी पारदर्शकता शक्‍य आहे?

Tags: A transparent relationshipabout turn
Previous Post

महिलांनी आधी स्वतः आनंदी राहायला शिकले पाहिजे :अभिनेत्री विद्या बालन

Next Post

मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची झाली दुर्दशा; जलवाहिनी फुटल्याने रस्त्यांवर पाणी

शिफारस केलेल्या बातम्या

अबाऊट टर्न: भंगारजीवी
संपादकीय

अबाऊट टर्न: भंगारजीवी

1 month ago
अबाऊट टर्न : भविष्य वितळतंय!
संपादकीय

अबाऊट टर्न : भविष्य वितळतंय!

3 months ago
अबाऊट टर्न: शांततावादी बंदूक
संपादकीय

अबाऊट टर्न: शांततावादी बंदूक

4 months ago
अबाऊट टर्न : समानतेची मोजणी
संपादकीय

अबाऊट टर्न : समानतेची मोजणी

4 months ago
Next Post
मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची झाली दुर्दशा; जलवाहिनी फुटल्याने रस्त्यांवर पाणी

मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची झाली दुर्दशा; जलवाहिनी फुटल्याने रस्त्यांवर पाणी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: A transparent relationshipabout turn

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही