शरद पवारांविषयी पी. चिदंबरम यांचे मोठे वक्‍तव्य

नवी दिल्ली – शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच माजी कॅबिनेट मंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी आज मोठे वक्‍तव्य केले आहे.

पी. चिदंबरम म्हणाले, हे पद पंतप्रधानाचे नाही आणि स्वतः शरद पवार हेही यूपीएचे अध्यक्ष होण्यास तयार असल्याचे ऐकिवात नाही.

चिदंबरम म्हणाले, मला नाही वाटत की, स्वतः शरद पवारांनी यूपीएचे अध्यक्षपद मिळावे अशी इच्छा व्यक्‍त केली आहे.

अनेक पक्ष मिळून यूपीए तयार झाली असल्याने अध्यक्षपद अशाच व्यक्‍तीकडे दिले जाते ज्यांचा पक्ष मोठा आहे. मोठा पक्षाच्याच नेत्याची यूपीएच्या अध्यक्षपदी एकमुखी निवड केली जाते. आपण पंतप्रधानाची निवड करीत नाही आहोत.

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी यूपीएच्या घटक पक्षांच्या बैठकीबाबत म्हटले की, जेव्हा यूपीएची बेठक बोलाविली जाते तेव्हा एक कॉंग्रेस नेताच या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.