दीपिका पादुकोण आणि अनुष्का शर्मा यांच्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. काही बातम्यांमध्ये तर श्रद्धा कपूर पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार, असा दावाही केला जात आहे. यावर श्रद्धाचे वडिल आणि अभिनेते शक्ती कपूर यांनी खोचक प्रतिक्रिया देताना “मला ही श्रद्धाच्या लग्नाला बोलवा’ असा टोमना मारला आहे.
श्रद्धा कपूरच्या लग्नाविषयी काही पत्रकारांनी शक्ती कपूर यांची प्रतिक्रीया विचारली असता शक्ती कपूर यांनी हटके अंदाजात उत्तर देत म्हणाले की, “माझी मुलगी लग्न करतेय? प्लीज लग्न कधी आहे, हे मला सुद्धा सांगा आणि प्लीज मलाही लग्नाला बोलवा. मी तिचा बाबा आहे, पण मलाच या लग्नाबद्दल माहित नाही.’ शक्ती कपूर यांच्या उत्तरावरुन तरी सध्या श्रद्धाच्या लग्नाच्या केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास श्रद्धा सध्या “साहो’ आणि “स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटात व्यस्त आहे. येत्या 15 ऑगस्टला “साहो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर “स्ट्रिट डान्सर’मध्ये ती वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.