मुंबई : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला आता 30 वर्षे झाली आहेत आणि हे जोडपे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. गौरी 2005 मध्ये कॉफी विथ करणच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. शो दरम्यान, गौरीला शाहरुखच्या एका चित्रपटाचे नाव विचारण्यात आले जे तिला आवडत नाही, तेव्हा तिने त्याच्या 2002 च्या शक्ती: द पॉवर चित्रपटाचे नाव दिले. मात्र, मी शाहरुखवर टीका करते असे मला वाटत नाही, असेही गौरी म्हणाली. म्हणजे त्याचा एखादा चित्रपट वाईट असेल तर त्याला कौतुकाची गरज नाही. जर ते वाईट असेल तर शाहरुखला ते स्वीकारावे लागेल. असं गौरीने सांगितले.
गौरीने पुढे शाहरुखच्या चित्रपटातील अभिनयाबद्दल बोलतांना म्हणाली,’एक प्रेक्षक म्हणून जर मला वाटत असेल की त्याने ओव्हरकटिंग केली असेल तर मी त्याला सांगायला हवे. यानंतर करणने गौरीला शाहरुखच्या काही वाईट चित्रपटांची नावे विचारली. गौरीने उत्तर दिले, नाही, त्याचे अनेक चित्रपट चांगले आहेत आणि मी त्याचे बरेच वाईट चित्रपट पाहिलेले नाहीत. जेव्हा करणने पुन्हा शाहरुखच्या शक्ती: द पॉवर चित्रपटाचा उल्लेख केला, तेव्हा गौरीने उत्तर दिले, होय.. त्याने सर्वात जास्त ओव्हरअॅक्ट या चित्रपटात केलाय.
शक्ती: द पॉवर 2002 मध्ये रिलीज झाला होता. त्यात करिश्मा कपूर, नाना पाटेकर आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 1998 च्या तेलुगू चित्रपट अंतपुरमचा रिमेक होता, जो अमेरिकन लेखिका बेट्टी महमूदी यांच्या चरित्रावर आधारित होता. चित्रपटात शाहरुख जयसिंगच्या भूमिकेत दिसला होता जो नंदिनी (करिश्मा कपूर) ला तिचा धोकादायक सासरा नरसिंह (नाना पाटेकर) पासून पळून जाण्यास मदत करतो.