एका दिवसात सर्वाधिक 57,584 रुग्ण बरे होण्याचा विक्रम
नवी दिल्ली – कोविड-19 चाचण्यांचा नवा विक्रम भारताने प्रस्थापित केला आहे. एका दिवसात सुमारे 9 लाख चाचण्या केल्या असून एका दिवसात केलेल्या आजवरच्या या सर्वात अधिक चाचण्या आहेत. यामुळे, आजपर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या 3 कोटी 09 लाख 41 हजार 264 इतकी झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर, 8.81 टक्के इतका कमी राहिला आहे, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सरासरी दर 8.84 टक्के इतका होता.
भारतात गेल्या चोवीस तासात, कोविडचे 57 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले असून हा ही नवा विक्रम आहे. याच काळात, देशात 55 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. आता अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्याना उपचारानंतर सुट्टी दिली जात असल्याने, आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19 लाखांच्या वर गेली आहे. यामुळे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या यातील तफावत 13 लाखांच्याही पुढे गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 73.18 टक्के इतका झाला आहे आणि कोविडचा मृत्यूदर 1.92 टक्यांपर्यंत कमी झाला आहे.
सध्या देशात एकून सक्रीय रुग्णांची संख्या 6 लाख 73 हजार 166 इतकी असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत हा दर 24.91 टक्के इतका आहे.
देशभरात कोविडच्या चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशात, एकूण 1,476 प्रयोगशाळांमध्ये कोविडच्या चाचण्या होत आहेत. त्यापैकी 971 प्रयोगशाळा सरकारी तर 505 प्रयोगशाळा खाजगी आहेत.