सौरवला त्याच्या मुलीविषयी एक्स गर्लफ्रेंड दिला हा सल्ला

मुंबई  –  नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या जामियाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीने देशभरात एक तणावाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातच आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना हिची एक इंस्टाग्राम पोस्टही चर्चेचा विषय बनली आहे.

मात्र, सौरव गांगुलीने स्वतः सनाच्या व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण देताना, ती व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सांगत सनाला अशा मुद्द्यांपासून दूर ठेवा असे आवाहन ट्विटद्वारे केले होते. या ट्विटवर सौरव गांगुलीला अनेक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे.

 

View this post on Instagram

 

Life feels on the Edge one way or the other .

A post shared by NAGMA (@nagma_actress) on


याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि काँग्रेस नेता नगमाने ट्विट करत सौरव गांगुली यांना सल्ला दिला आहे. अभिनेत्री नगमा आणि सौरव यांची  प्रेमकहाणी साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे तिने सनाबाबत दिलेली सल्ला सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.


अभिनेत्री आणि काँग्रेस नेता नगमाने ट्विट केले आहे की,’मी सनाला शुभेच्छा देते, की तिने देशातील परिस्थितीवर भाष्य केले, तसेच मी सौरव गांगुली यांना विनंती करते की त्यांनी तिला आपले विचार स्वतंत्रपणे शेअर करण्याची अनुमती द्यावी तिच्या विचारांना  प्रोत्साहित केले पाहिजे कारण यामुळे तिला सुद्धा लक्षात येईल कि ती मतदान करण्यासाठी पात्र आहे. असं ही लिहिल जात आहे. दरम्यान, सनाने केलेली पोस्ट काही कशातच  व्हायरल झाली होती या पोस्टच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्यामुळे सौरव गांगुलीने यावर ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.