पुण्यात दिवसभरात सुमारे 42 हजार जणांचे लसीकरण

पुणे – बऱ्याच दिवसांनी गुरूवारी मोठ्याप्रमाणात लसीकरण झाले असून, दिवसभरात 42 हजार 564 जणांचे लसीकरण झाले. 186 केंद्रावर कोविशील्ड आणि 6 केंद्रावर कोवॅक्‍सीनचे डोस देण्यात आले.

186 केंद्रांवर प्रत्येकी 200 लसींचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय व्हायल्समध्ये लसीची मात्रा राहिली असेल, तर त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोवॅक्‍सिनचे सहा केंद्रांवर प्रत्येकी 300 डोसचे नियोजन करण्यात आले.

त्यामुळे एका दिवसांत सुमारे 60 हजार जणांचे लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील 42 हजार 564 जणांचे लसीकरण झाले. गेल्या अनेक दिवसापासून कोविशील्ड लसीच्या उपलब्धतेबाबत दोलायमान स्थिती होती. मात्र, गुरूवारी मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.