30 हजार मदरशांना मुख्य प्रवाहात आणणार – पाक लष्कराची माहिती

इस्लामाबाद – पाकिस्तानातील तब्बल 30 हजार मदरशांना मुख्य शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यात येणार आहे. कट्टरवादाविरोधातील अभियानाचा भाग म्हणून हे मदरसे मुख्य प्रवाहाशी जोडले जाणार आहेत, असे पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्‍त्यांनी सोमवारी सांगितले. रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेमध्ये मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानात धार्मिक शिक्षण संस्थांची वाढ गेल्या अर्धदशकामध्ये खूप झपाट्याने झाली आहे. पाकिस्तानमध्ये 1947 साली केवळ 247 धार्मिक शिक्षण संस्था होत्या. मात्र 1980 मध्ये या धार्मिक शिक्षण संस्थांची संख्या 2,861 इतकी झाली होती. तर आज या संस्थांची संख्या 30 हजारांवर पोहोचली आहे. त्यापोऐकी केवळ 100 मदरसे दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या दहशतवादी कृत्यांना रोखण्यासाठी मदरशांना मुख्य प्रवाहात आणण्याचे पाऊल उचलले गेले आहे, असे या प्रवक्‍त्याने सांगितले.

सर्व मदरसे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणले जातील. तेथे सद्यस्थितीतील शिक्षण दिले जाईल. त्यांचा अभ्यासक्रम निश्‍चित केला जाईल. तेथे द्वेषभावना चिथावणारी भाषणे दिली जाणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना अन्य पंथियांचा मान राखण्यासही शिकवले जाईल, या विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.