23 लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले करोनामुक्त
नवी दिल्ली – देशातील त्वरित निदान आणि प्रभावी उपचारांसह अलगीकरण यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि कोविड 19 मुळे मृत्युदर घटत आहे. देशात आतापर्यंत 3,59,02,137 चाचण्या केल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 6,09,917 चाचण्या करण्यात आल्या. देशभरातील निदान प्रयोगशाळा नेटवर्कचा विस्तार केल्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करणे शक्य झाले आहे. यामुळे प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांची संख्या 26, 016.वर पोहचली आहे. प्रति दहा लाख लोकांच्या चाचण्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज देशात 1520 प्रयोगशाळा असून सरकारी क्षेत्रात 984 प्रयोगशाळा आणि 536 खासगी प्रयोगशाळा आहेत.
बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या आज 23 लाखांपेक्षा जास्त आहे. या रुग्णांना आजारातून पूर्णपणे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहे. तसेच अगदी किरकोळ, सौम्य आणि मध्यम प्रकारची लागण झालेल्या रुग्णांना घरामध्येच विलग ठेवण्यात आले आहे.
देशातला करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा आकडा 23 लाख 38 हजारांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये करोनाचे 57 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशामध्ये कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,10,771 आहे. या रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 22 टक्के आहे.