एसटीच्या ताफ्यात 150 महिला चालक दाखल होणार

मुंबई : एसटीत महिला वाहकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता एसटीचे स्टेअरिंग हे महिलांच्या हाती जाणार आहे. म्हणजेच आता लवकरच एसटीच्या ताफ्यात 150 महिला चालक दाखल होणार आहेत. एसटीकडून चालक-वाहक म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत 150 महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत त्यांचे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणानंतर त्या एसटीच्या सेवेत दाखल होणार आहेत.

सध्या एसटीची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यात महिलांना राखीव जागा देण्यात आल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त महिलांचा यात समावेश व्हावा यासाठी भरतीच्या नियमांमध्ये शिथीलता देखील आणण्यात आली. दरम्यान, सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर 150 महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र त्यांना अवजड वाहने चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना एक वर्ष याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील परंतु, त्यांना सुरूवातीला जवळच्या पल्ल्याचा प्रवास आणि नंतर लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवास देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.