गेल्या आठवड्यात अभिषेक बच्चन आणि एलियाना डीक्रूज यांचा “द बिग बुल’ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. मात्र या सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच निर्मात्यांना एक मोठा धक्का बसला आहे. तमिळ रॉकर्स आणि अनेक वेबसाईटवर हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे.
अनेक वेबसाईटवर तो डाउनलोडिंगसाठी ही उपलब्ध आहे. याबरोबर तो इन्स्टाग्रामवरही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
“स्कॅम 1992′ या वेब सिरीजमुळे “द बिग बुल’चा रिलीज पुढे ढकलला लागला होता. मात्र आता ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे सगळे प्रयत्न विफल होण्याची शक्यता आहे. हर्षद मेहताने शेअर बाजारात केलेल्या महाघोटाळ्यावर हा सिनेमा आधारलेला आहे.