अभिषेक बच्चनने गुरुवारपासून कोलकात्यामध्ये बॉब बिस्वासचे शुटिंग सुरू केले. अभिषेकने शुक्रवारी सकाळी सकाळीच इन्स्टाग्रामवर आपल्या शुटिंगच्या पहिल्या दिवसाचा रिपोर्ट पोस्ट केला आहे.
त्याने सिनेमाबद्दल फारसे काही सांगितलेले नाही, मात्र एक जाड भिंगाचा चष्मा आणि मोटोरोला मोबाईल फोनचा फोटोच केवळ पोस्ट केला आहे.
नोमोश्कार बॉब बिस्वास डे 1 एवढेच त्याने कॅप्शनमध्ये पोस्ट केले. या गेटअपमध्ये अभिषेक बच्चनचा लुक लवकरच पोस्ट होईल. त्यानंतर त्याच्या रोलविषयीदेखील अधिक माहिती मिळू शकेल. त्याच्या या फोटोवर अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत. विकी कौशल, फराह खान, अनुपम खेर आदींनी मस्त कॉमेंट केल्या आहेत. त्यांनी अभिषेकला शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुपम खेरने गो फॉर इट असे म्हटले आहे. बॉब बिस्वास ही एका बंगाली बाबूची कथा आहे. हा बॉब बिस्वास विद्या बालनच्या कहानीमध्ये दिसला होता. त्या सिनेमामध्ये सास्वत चॅटर्जीने हा रोल केला होता. नवोदित दिग्दर्शिका दिव्या घोषच्या दिग्दर्शनाखाली आणि सुजोय घोषने लिहिलेल्या या सिनेमाची निर्मिती स्वतः शाहरुख खानने केली आहे.