मुंबई – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आणि अनेकदा व्हायरल होत असलेल्या फोटोचे सत्य जाणून न घेताच लोक शेअर आणि कमेंट करू लागतात. असंच काहीसं बॉलिवूडचे शहनशाह म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांच्या बरोबर घडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बींचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत अमिताभ बच्चन एका व्यक्तीसोबत हात मिळवत असताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांना हात मिळवणारा हा व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचा दावा करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बिग बींचा हा फोटो व्हायरल तुफान होत असून, त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.
व्हायरल झालेल्या फोटोत दिसणारी व्यक्ती हुबेहुब दाऊद प्रमाणे दिसत आहे. आणि अमिताभ बच्चन या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, आता या फोटोबाबत अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन पुढे आला असून त्याने व्हायरल होणाऱ्या फोटोमागचे सत्य सांगितले आहे.
भईसाहब, यह फ़ोटो मेरे पिताजी और महाराष्ट्र के पूर्व मुख्य मंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण की हैं।
🙏🏽— Abhishek Bachchan (@juniorbachchan) September 18, 2020
अभिषेक बच्चनने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे की, “दादा हा फोटो माझे वडील अमिताभ बच्चन आणि महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांचा आहे”. अभिषेक बच्चनने याचे उत्तर दिल्यानंतर युजरने हा फोटो डिलीट केला आहे.