नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील शरद पवार गटाची विद्यार्थी संघटना सक्रिय ठेवण्याचे काम ज्यांनी केले ते अभिराजसिंह आरगडे यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीचे नेवासा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
येणाऱ्या काळात युवक संघटनेमध्ये संघटनात्मक आणि पारदर्शक काम करून युवा नेते अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आरगडे यांनी दिले आहे.
गेल्या साडे तीन वर्षापासून नेवासा तालुक्याच्या शरद पवार गटाच्या नेवासा विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे. साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थी हिताच्या अनेक आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे.
त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला आता अधिक ताकद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.