परिषदेच्या दिल्ली सहसचिव अनिमा सोनकर यांची निमंत्रितांच्या चर्चेत माहिती
नवी दिल्ली : जवाहरलाला नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हातात रॉड घेतलेला युवक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पदाधिकारी असल्याचे अभाविपच्या दिल्ली सहसचिव अनिमा सोनकर यांनी सांगितले.
रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले झाले होते. त्यावेळच्या व्हिडिओबाबत टाईम्स नाऊ या वाहिनीवर झालेल्या निमंत्रितांच्या चर्चेत सोनकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या दोन माणसांनी सळ्या हातात घेतल्या आहेत.
त्या स्व संरक्षणासाठी घेतल्या आहेत. त्यांना व्हॉट्स ऍफ ग्रुपवर बाहेर पडताना शस्त्र सोबत ठेवण्यास सांगण्यात आले होते. सर्वच व्हॉट्स ऍफ ग्रुपवर इतकी भीती पसरली होती… तुम्ही बाहेर पडणार असाल तर गटाने बाहेर पडा, सळ्या आणि लाठ्या घेऊन बाहेर पडा.
तिखटाचा स्प्रे, किंवा ऍसिड सोबत घेऊब तयार रहा असे संदेश पसरत होते. मात्र ऍसिड हल्ला झाल्याची कोणतीही घटना मी ऐकली नाही अथवा पाहिली नाही, असे त्या म्हणाल्या.