कोल्हापूर प्रतिनिधी): राज्यातील गडचिरोली या नक्षलवादी भागात कौतुकास्पद केलेल्या कामगिरीची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केंद्र शासनाच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
याशिवाय जिल्ह्यातील इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 21 अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलवादी भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल गृह विभागाच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक दिले जाते. हे पदक महाराष्ट्रात नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भरघोस योगदान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाते.