पंतप्रधान मोदींचे हमशक्ल ‘राजनाथ सिंह’ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे अभिनंदन पाठक यंदाच्या लोकसभा2019 च्या निवडणुकीत आपल नशीब आजमणार आहे. मोदीचे हमशक्ल अभिनंदन यांनी शुक्रवारी लखनऊ येथून अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला.तसेच ते वाराणसी येथून देखील निवडणुक लढवणार आहेत.

दरम्यान, लखनऊ येथे भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे उमेदवार आहेत. अभिनंदन पाठक यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपासाठी प्रचार केला होता, मात्र यंदा ते काँग्रेस साठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, मी बनारस (वाराणसी) येथून सुध्दा 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
मी डमी उमेदवार नाही तसेच मी कोणाच्या विरोधात देखील नाही, फक्त जुमल्याच्या विरोधात आहे. निवडणुक जिंकल्यानंतर मी राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याचे समर्थन करीन.

Leave A Reply

Your email address will not be published.