“अभिनंदन’ विवेक

शीर्षक वाचून विवेककडे काही गुड न्यूज आहे असे वाटले असेल तर थांबा. तसे काहीही नाहीये. विवेक आपल्या आगामी चित्रपटामध्ये भारताचा जॉंबाज वैमानिक अभिनंदन याची व्यक्‍तिरेखा साकारणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकवर आधारित हा चित्रपट असून चित्रपटाचे नावच अभिनंदन असे आहे. भारतीय वायुसेनेची शौर्यगाथा या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.

विवेकचे म्हणणे आहे की, हा चित्रपट तरुणपिढीला प्रेरणादायी ठरेल. इतकेच नव्हे तर अमेरिकन चित्रपट “टॉप गन’ या चित्रपटाला आव्हान देण्यासही हा चित्रपट कमी पडणार नाही. या चित्रपटातून विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा नशीब आजमावत आहे. मध्यंतरी, त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटाची चर्चा भरपूर झाली; पण तिकिट खिडकीवर जादू दाखवण्यात हा चित्रपट साफ अपयशी ठरला होता.

आता बालाकोटसारख्या संवेदनशील विषयावर आधारेला हा चित्रपट विवेकसाठी हुकमी एक्‍का ठरतो का हे पाहावे लागेल. विवेक नेहमीच पब्लिसिटीसाठी प्रयत्नशील असतो. आम्हा कलाकारांची ही सवय आहे असे समजा असे सांगणारा विवेक या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही; पण प्रेक्षक त्याला कितपत स्वीकारतात हे पाहणे औचित्याचे ठरेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)