रोहित शेट्टीचे सगळे सिनेमे कॉप ड्रामा सिनेमे म्हणून फेमस असतात. अजय देवगणचा “सिंघम’, “सिंघम रिटर्न्स’, रणवीर सिंहचा “सिम्बा’ ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. आता अक्षय कुमारला पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये घेऊन रोहित शेट्टी येतो आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमामध्ये हिरोला जेवढे महत्व असते, तेवढेच महत्व व्हिलनलाही असते. “सूर्यवंशी’मध्ये सोनू सूद हा व्हिलन असणार असे आगोदर समजले होते. मात्र आता त्याच्यापेक्षाही अधिक खतरनाक ऍक्टर व्हिलनच्या रोलमध्ये दिसणार आहे.
“गुलाल’ आणि “मॉम’सारख्या सिनेमांमध्ये खलनायक रंगवलेल्या अभिमन्यू सिंहला अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’मध्ये निगेटिव्ह रोल मिळाला आहे. अभिमन्यू सिंहने आतापर्यंत निगेटिव्ह रोलमध्ये अनेक सिनेमांमधून काम केलेले आहे. तामिळ ऍक्शन थ्रिलर सिनेमा “थिरान’मध्ये रोहित शेट्टीने अभिमन्यूला बघितले होते. त्यातला व्हिलन बराचसा हिरोसारखाच होता. “सूर्यवंशी’मधील व्हिलन प्रत्यक्ष पुढे न येणारा पण अत्यंत घातक असणार आहे. देशातील सर्व पोलिसांच्या विरोधात त्याने युद्धच पुकारलेले असते. अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि नीना गुप्ता हे या सिनेमातील प्रमुख कलाकार आहेत. “सूर्यवंशी’ हा दहशतवादाविरोधातला सिनेमा आहे आणि अक्षय कुमार “एटीएस’चा अधिकारी म्हणून दिसणार आहे.